Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Buying Cleaning Cooking Fish Article in Marathi

$
0
0
पापलेट किंवा मासे ताजे आहेत हे कसे ओळखावे ? माश्याचा तोंडाचा भाग दाबून पाहिला असता आतून पांढरे पाणी निघाले टर टे चांगले आहेत असे ओळखावे. पेडवे, तारले, पाचसळी, बांगडे ह्या माशांचे डोळे लाल व चकचकीत असले म्हणजे ते मासे ताजे आहेत असे समजावे. कोलंबी ही मऊ व अगदी रंगाने फिकट दिसत असेलतर ती ताजी नाही असे समजावे. बोंबीलची तोंड बंद असून ती लाल असावीत. चिंबोऱ्या काळ्या असाव्यात व भरीव असाव्यात सारंगा ताजा कसा ओळखावा ते म्हणजे त्याचे खवले घट्ट व ताजे असावेत व त्याला कुबट वास नसावा. जर कुबट वास येत असेलतर त्या शिळ्या आहेत असे समजावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या ताज्या कश्या ओळखाव्यात तर त्याच्या शिंपल्याची तोंडे उघडली नसावीत. मासे कसे साफ करावेत मासे साफ करतांना जरा काळजी घ्यावी. मासे साफ करतांना काही जण सुरी, विळी, कात्री व कोयता उलट्या बाजूनी वापरतात. आपण घरी मासे साफ करतांना सुरी, कात्री अथवा विळी चा उपयोग करतो. कोळी लोकं कोयत्याचा उपयोग करतात. त्याने माशाचे खवले सरासर निघतात. विळीवर मासे साफ करतांना माशाची दोनी टोके दोनी हाताच्या बोटांनी घट्ट पकडून मासा आडवा पकडून वीळीच्या पात्यावर हलकेच फिरवत खवले काढावेत. मोठे मासे म्हणजे पापलेट, सरंगा, घोळ, रावस, सुरमई साफ करतांना त्याचे डोळे, पोटातील बाजू, आतील पिताशय , तोंड काढून साफ करावे. नंतर त्याला मीठ लाऊन [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles