ओव्याच्या पुऱ्या किंवा अजवाईन पुरी: अजवाईन पुरी ही नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. मुले अश्या प्रकारच्या पुऱ्या आवडीने खातात. गव्हाचे पीठ व रवा वापरून त्यामध्ये ओवा वापरला आहे. पुरीला ओव्याचा छान सुगंध येतो. रवा वापरल्यामुळे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात. The English language version of this Ajwain Puri preparation method can be seen here – Tasty Ajwain Pooris बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: २० पुऱ्या बनतात साहित्य: १ कप गव्हाचे पीठ १ कप रवा २ टे स्पून ओवा १/४ टी स्पून हळदपावडर २ टे स्पून तूप (गरम करून) मीठ चवीने तेल पुरी तळण्यासाठी Ajwain Puri कृती: गव्हाचे पीठ, रवा, हळद, मीठ, ओवा व गरम (कडकडीत) तूप घालून मिक्स करून घ्या. मग पाणी वापरून पुरीचे पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर १५-२० मिनिट तसेच बाजूला ठेवावे. मग पीठाचे एक सारखे २० गोळे बनवावेत. एक एक गोळा घेऊन त्याची थोडीशी जाडसर पुरी लाटून घ्या. कढईमधे तेल गरम करून पुऱ्या छान कुरकुरीत तळून घ्या.
↧