श्री सत्यनारायण पूजा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. सत्यनारायणाची पूजाही दर महिन्याच्या पौर्णिमेला तसेच संक्रांतीला केलेली फलदाई असते. पण वेळेच्या अभावी आपल्याला दरमहिन्याच्या पौर्णिमेला करणे शक्य होत नसेल तर इतर चांगल्या दिवशी करावी. श्री सत्यनारायण पूजा कमी वेळात कशी करता येईल ते मी लिहीत आहे. ही पूजा आपण आपली करता येते. आज काल सगळ्यांना वेळेची टंचाई आहे. प्रतेकजण कामामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आपल्या काही पारंपारिक रीतीरिवाज कमी व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढीला आपले रीतीरिवाज माहिती होणार नाहीत. म्हणूनच आपण आपले रीतीरिवाज थोडक्यात केले तर आपल्याला त्याचे समाधान सुद्धा मिळते. श्री सत्यनारायण पूजा करण्यासाठी खालील सामानाची तयारी करावी. पूजेसाठी खालील साहित्य आहे. हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, रांगोळी, उदबत्ती, कापूर, १५ विड्याची पाने, १ नारळ, ५ बदाम, ५ हळकुंड, ५ सुक्या खोबऱ्याचे छोटे तुकडे, ५ सुपाऱ्या, नाणी (एक रुपयाची), ६ केळी, १ तुळशीच्या पानांची जुडी, २ हार, फुले, तांदूळ किंवा गहू, काडेपेटी, सत्यनारायण कथेचे पुस्तक ई. पाट, १ तांब्या, २ ताम्हण, पळी, पंचपात्र, घंटा, बाळकृष्ण, श्री सत्यनारायण फोटो नसेल तर श्री दत्तात्रय फोटो, निरंजन (तुपाची फुलवात), कापसाची वस्त्रे, समई (तेलाची वात), काडेच पेटी, पूजेसाठी तबक, गुळ-खोबरे, प्रसादाचा शिरा, पंचामृत, महाप्रसाद (जे काय बनवले आहे) श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद साहित्य: साजूक तूप, रवा, साखर, दुध प्रतेकी सव्वा ह्या मापाने प्रमाण घ्यावे (म्हणजे [...]
The post Simple Satyanarayana Pooja at Home in Marathi appeared first on Royal Chef Sujata.