गोड शेव: दिवाळी फराळ साठी एक छानपदार्थ आहे.आपण नेहमी तिखट शेव बनवतो गोड शेव बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. गोड शेव बनवायला खूप सोपी आहे लहान मुलांना खूप आवडेल. ही शेव बनवतांना जरा जाड भोकाची चाकी वापरावी त्यामुळे त्यावर साखरेचा पाक शेवेवर छान बसतो व कुरकुरीत रहाते. The English language version of this Maharashtrian Sev recipe and its preparation method can be seen here- Sweet and Tasty Sev बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ७-८ जणासाठी साहित्य: शेवे बनवण्यासाठी: २ कप बेसन १ कप तांदळाचे पीठ १/४ कप बटर १ टे स्पून तेल (गरम) मीठ चवीने तेल शेव तळण्यासाठी साखरेचा पाक करण्यासाठी: २ कप साखर १ कप साखर २ टी स्पून वेलचीपूड God Sev कृती: शेव बनवण्यासाठी: प्रथम बेसन, तांदळाचे पीठ व मीठ चाळून घ्या. मग त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन व बटर घालून मिक्स करून घेऊन थोडे-थोडे पाणी लागेल तसे वापरून शेवेचे पीठ भिजवून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. शेवेच्या साचामध्ये पीठ भरून थोडे मोठे भोक असलेली चाकी लावा व कडकडीत तेलामध्ये शेव घाला. शेव घालतांना विस्तव मोठा ठेवा व शेव घालून उलट करून मंद विस्तवावर सोनेरी रंगावर शेव तळून घ्या. शेव तळल्यावर पेपरवर काढा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन. अश्या प्रकारे शेव बनवून घ्या. पाक बनवण्यासाठी: मोठ्या कढईमधे साखर [...]
The post God Sev Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.