बटाट्या वड्याची चटणी: ही चटणी बटाटेवडा, मेदुवडा, डोसा ह्या पदार्था बरोबर छान लागते. बटाट्या वड्याची चटणी ही खमंग लागते. ही चटणी बनवतांना ओला नारळ, शेगदाणे, कोथंबीर वापरली आहे व वरतून फोडणी दिली आहे. त्यामुळे छान खमंग लागते. The English language version of the Batata Vada Chutney recipe and preparation method can be seen here – Green Chutney for Batata Vada बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १/२ कप ओला नारळ (खोऊन) ५-६ हिरव्या मिरच्या १/४ कप कोथंबीर ४-५ लसूण पाकळ्या २ टे भाजलेले दाणे १ टी स्पून लिंबूरस मीठ व साखर चवीने फोडणी करीता: १ टी स्पून तेल ५-६ कडीपत्ता पाने १ टी स्पून मोहरी १/४ टी स्पून हिंग Spicy Green Chutney for Batata Vada कृती: शेंगदाणे भाजून, सोलून घ्या. नारळ खऊन घ्या. कोथंबीर धुऊन चिरून घ्या. नारळ, हिरव्या मिरच्या, कोथंबीर, लसूण, शेंगदाणे, लिंबूरस, मीठ, साखर व २ टे स्पून पाणी घालून वाटून घ्या. चटणी वाटून घेतल्यावर एका भांड्यात काढून घ्या. फोडणीच्या वाटी मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कडीपत्ता, मोहरी व हिंग घालून खमंग फोडणी चटणीवर घालावी.
↧