ज्वारीची इडली : इडलीचा हा एक नवीन प्रकार आहे. ही इडली बनवतांना ज्वारी, तांदूळ, उडीदडाळ, रवा वापरला आहे. आपण नेहमी तांदूळ व उडीदडाळ वापरून इडली बनवतो. अश्या प्रकारची इडली बनवून बघा छान टेस्टी लागते. लहान मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. The English language version of the recipe and preparation method of this Jowar Idli can be seen here – White Millet Idli बनवण्यासाठी वेळ: २० जणांसाठी वाढणी: ३६ इडल्या बनतात साहित्य: १ कप तांदूळ १ कप उडीदडाळ १ कप ज्वारी १ कप रवा एक चिमुट सोडा मीठ चवीने तेल Jowar Idli कृती: प्रथम तांदूळ, उडीदडाळ, ज्वारी, धुऊन ७-८ तास वेगवेगळे पाण्यात भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटुन घ्या. वाटुन झाल्यावर त्यामध्ये रवा मिक्स करून मिश्रण परत ७-८ तास झाकून ठेवा. (सकाळी नाश्त्याला इडली बनवायची असेल तर आधले दिवशी सकाळी धान्य भिजत घालून संद्याकाळी वाटावे मग त्यामध्ये रवा घालून मिक्स करून दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवावी.) दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून एक तास मिश्रण परत बाजूला ठेवा. एक तासाने कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवावे व इडली पात्राला तेलाचा हात लाऊन मिश्रण घालावे. कुकर मधील पाणी गरम झालेकी इडली पात्र कुकरमध्ये ठेऊन झाकण लाऊन शिटी काढून घ्यावी. इडलीला १०-१२ मिनिट वाफवून घ्या. [...]
↧