छोले भटुरे: छोले भटुरे ही पंजाबी लोकांची लोकप्रिय डीश आहे पण आता ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. छोले भटुरे हे आपण नाश्त्याला किंवा जेवणामध्ये, मुलांच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. छोले हे काबुली चण्याचे बनवतात व भटुरे हे मैदा व दही वापरून बनवतात. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यासाठी सुद्धा ही डीश छान आहे. घरच्या घरी हॉटेलमध्ये बनवतात तसे छोले-भटुरे बनवता येतात. The English language version of this Indian Fast-Food recipe and its preparation method can be seen here – Fast-Food Stall Style Chole Bhature बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १/४ किलो ग्राम कबुलीचणे (२५० ग्राम) १ मोठा कांदा (बारीक चिरून) १ मोठा टोमाटो (बारेक चिरून) १/२ टी स्पून हळद १ टी स्पून छोले मसाला २ चिमुट बेकिंग सोडा २ टे स्पून चिंचेचा कोळ २ टे स्पून तेल मीठ चवीने १/४ कप कोथंबीर (चिरून) मसाल्या करीता: १ टे स्पून तेल १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून) १/२ कप ओला नारळ ७-८ लसूण पाकळ्या १/२” आले तुकडा १ १/२ लाल मिरची पावडर कृती: पहिल्यांदा छोले ७-८ तास भिजत ठेवा. (आधल्या रात्री) मग कुकुरमध्ये छोले, थोडे पाणी व दोन चिमुट सोडा घालून कुकरला ४-५ शिट्या काढून घ्या. सोडा घातल्यामुळे छोले छान मऊ शिजतात. कांदा, टोमाटो बारीक चिरून घ्या. आले-लसूण चिरून [...]
↧