हिरवे मटार-पनीर कचोरी: हिरवे ताजे मटार बाजारात आलेकी की आपण मटारचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. मटारची कचोरी हा एक नाश्त्याला बनवण्यासाठी छान पदार्थ आहे. कचोरी बनवताना पनीर व हिरवे ताजे मटार वापरले आहेत. ही कचोरी छान चवीस्ट लागते. The English language version of the same Kachori recipe can be seen here – Paneer Matar Kachori बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १०-१२ बनतात साहित्य: १/२ कप पनीर १/२ कप हिरवे ताजे मटार (उकडून) ३-४ हिरव्या मिरच्या ७-८ लसूण पाकळ्या १/२ टी स्पून बडीशेप १ टी स्पून गरम मसाला १ टी स्पून लाल मिरची पावडर मीठ चवीने आवरणासाठी: १ कप मैदा १ टे स्पून कॉर्नफ्लोअर १ टे स्पून तेल (गरम) मीठ चवीने तेल कचोरी तळण्यासाठी फोडणी करीता: १ टे स्पून तेल Hirve Matar Paneer Kachori कृती: सारणा करीता: हिरवे मटार उकडून थोडे ठेचून घ्या. लसून, बडीशॊप, हिरवी मिरची वाटून घ्या. पनीर किसून घ्या. एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये किसलेले पनीर, घालून एक मिनिट परतून घेवून त्यामध्ये ठेचलेले मटार, गरम मसाला, मीठ, लाल मिरची पावडर घालून मिक्स करून दोन मिनिट चांगली वाफ आणा. आवरणाकरीता: मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ, गरम तेल मिक्स करून घटत पीठ मळून घेऊन अर्धा तास बाजूला ठेवा. मग त्याचे १०-१२ छोटे गोळे बनवून [...]
↧