आंब्याची चटणी: आपण शेगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी अश्या अनेक प्रकारच्या चटण्या बनवतो. आंब्याची चटणी ही एक चवीस्ट चटणी आहे. आंब्याची चटणी छान आंबटगोड लागते. आंब्याची चटणी २-३ दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. कधी कधी चांगले आंबे सुद्धा आंबट निघतात त्यावेळी ते खाऊ शकत नाही तेव्हा अश्या प्रकारची चटणी करून बघा. ही चटणी बनवायला सोपी व झटपट बनणारी आहे. The English language version of the same Chutney recipe can be seen here – Piklelya Ambyachi Chutney बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप आंब्याचा रस २ टे स्पून गुळ २ लाल सुक्या मिरच्या २ टी स्पून मोहरी २ टे स्पून ओला नारळ मीठ चवीने Ripe Mango Chutney कृती: प्रथम लाल मिरच्या व मोहरी थोडीशी परतून घ्या व मिक्सरमध्ये बारीक बारीक पावडर करून घ्या. नारळ व गुळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका बाउलमध्ये आंब्याचा रस, लाल मिरची-मोहरी पूड, नारळ-गुळ व मीठ घालून मिश्रण एकसारखे करून घ्या. आंब्याची चटणी तयार झाली.
The post Ripe Mango Chutney Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.