काजूची कचोरी: काजूची कचोरी ही नाश्त्याला किंवा साईड डीश म्हणून बनवता येते. काजूची कचोरी बनवताना काजू, आले-लसूण, सुके खोबरे, बडीशेप, कोथंबीर वापरली आहे. तसेच आवरणासाठी मैदा वापरला आहे. काजूची कचोरी ही चवीला वेगळी लागते. बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २० बनतात साहित्य: सारणासाठी: १/२ कप कोथंबीर (चिरून) ४ लसूण पाकळ्या ६ हिरव्या मिरच्या २ टे स्पून सुके खोबरे (किसून) १ कप काजू १ कप कांदा (उभा पातळ चिरून तळून घ्या) १/२ टी स्पून धने-जिरे पावडर १/४ टी स्पून गरम मसाला १/४ टी स्पून बडीशेप १ टी स्पून साखर मीठ चवीने आवरणासाठी: २ कप मैदा २ टे स्पून वनस्पती तूप २ टे स्पून कॉर्नफ्लोर मीठ चवीने तेल कचोरी तळण्यासाठी Kaju Chi Kachor कृती: सारणासाठी: काजू पाण्यात एक तास भिजत ठेवा. मग पाण्यातून काढून पुसून कोरडे करून बारीक चिरून घ्या. कोथबीर, आले-लसून, हिरवी मिरची, सुके खोबरे (भाजून) मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईमधे एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये काजू, धने-जिरे पावडर, गरम मसाला, बडीशेप, तळलेला कांदा (कुस्करून), साखर, मीठ घालून सारण तयार करून घ्या. आवरणासाठी: मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ व वनस्पती तूप (गरम करून) मिक्स करून घेऊन थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ १० मिनिट बाजूला [...]
The post Kaju Chi Kachori Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.