Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Tasty Ambyacha Sheera Recipe in Marathi

$
0
0

आंब्याचा शिरा: एप्रिल व मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. मग आपण आंब्याचा रस वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो. आंब्याचा शिरा ही एक छान डीश आहे. आंब्याचा शिरा बनवतांना हापूस आंबा वापरावा म्हणजे शिरा चांगला चवीस्ट होतो. The English language version of this Sheera recipe can be seen here – Tasty Mango Sheera बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ कप रवा १ कप आंब्याचा पल्प २ टे स्पून तूप १/२ कप साखर १ कप दुध १ कप पाणी १ टी स्पून वेलचीपूड Ambyacha Sheera कृती: कढईमधे तूप गरम करून रवा घालून मिक्स करून घेऊन मंद विस्तवावर १०-१२ मिनिट भाजून घ्या. दुध व पाणी गरम करून घ्या. रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम दुध-पाणी घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग त्यामध्ये साखर, वेलचीपूड व आंब्याचा पल्प घालून दोन चांगल्या वाफा येवून द्या. मग कढईवर झाकण ठेवून १०-१५ मिनिट बाजूला ठेवा. मग सर्व्ह करा.

The post Tasty Ambyacha Sheera Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles