हेल्दी गाजर-मुळा पराठा: गाजर-मुळा पराठा चवीला खूप छान लागतो. गाजरामध्ये जीवनसत्व “ए” आहे. तसेच त्याच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो, त्यामध्ये लोह असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्त वाढते, रक्तशुद्धी होते व त्वचा रोग बरे होतात. The English language version of the same Paratha recipe can be seen here – Potato-Mooli Paratha बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ६ पराठे साहित्य: सारणासाठी: २ मध्यम आकाराचे मुळे २ मध्यम आकाराचे गाजर २ मोठे बटाटे (उकडून) १” आले (किसून) ३ हिरव्या मिरच्या १/४ कप कोथंबीर (चिरून) १ टे स्पून तेल १ टी स्पून जिरे मीठ चवीने आवरणासाठी: २ कप गव्हाचे पीठ १ टे स्पून तेल मीठ चवीने Healthy Muli Batata Paratha कृती: आवरणासाठी: गव्हाचे पीठ, तेल, मीठ व पाणी वापरून पीठ मळून घ्या. सारणासाठी: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या.गाजर, मुळे धुऊन, किसून घ्या. आले किसून घ्या. एका कढईमधे तेल गरम करून जिरे, हिरवी मिरची, आले व मीठ घालून किसलेले मुळे, गाजर घालून मिक्स करून कढईवर दोन मिनिट झाकण ठेवून एक वाफ आणा. कढई वरील झाकण काढून किसलेला बटाटा घालून मिक्स करून थोडे परतून घेऊन, चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करून सारण विस्तवावरून उतरवून बाजूला ठेवा. मळलेल्या पीठाचे एक सारखे १२ गोळे बनवून घ्या. दोन गोळे घेऊन पुरी प्रमाणे लाटून घ्या. एका पुरीवर दोन टे स्पून सारण [...]
The post Healthy Muli Batata Paratha Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.