पाकातल्या शंकरपाळ्या: पूर्वीच्या काळी दिवाळी म्हंटल की सगळा फराळ करायचे. पण आता आपण वर्षभर काहीना काही पदार्थ बनवत असतो. आपण नेहमी ज्या शंकरपाळ्या बनवतो त्या साखर, दुध व मैदा मिक्स करून बनवतो. पण ह्यामध्ये आधी साध्या शंकरपाळ्या बनवून मग पाकामध्ये घोळून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या शंकरपाळ्याची चव वेगळीच लागते व पाकात घोळल्यावर शंकरपाळी वर साखरेचा छान पांढरा थर येतो व शंकरपाळ्या छान खुटखुटीत होतात. मुलांना अश्या शंकरपाळ्या खूप आवडतात. The English language version of the same Shankarpali recipe can be seen here – Sugar Syrup Dipped Skankarpali बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४-५ जणासाठी साहित्य: शंकरपाळी करीता: २ कप मैदा १/४ कप डालडा (गरम) १/२ टी स्पून बेकीग पावडर मीठ चवीने २ कप तूप शंकरपाळी तळण्यासाठी पाकासाठी: १ कप साखर २ टे स्पून पाणी Pakatle Shankarpali कृती: शंकरपाळी करीता: मैदा, बेकीग पावडर, मीठ व गरम तूप मिक्स करून घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊन १ तास बाजूला ठेवा. पाकासाठी : साखर व पाणी मिक्स करून मंद विस्तवावर थोडा घट्टसर थोडा चिकट पाक बनवून घ्या. मळलेल्या पीठाचे ३ एक सारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा थोडा जाडसर लाटून घेऊन त्याच्या १” लांबीच्या पट्या कापून घ्या. अश्या प्रकारे दोनी गोळे लाटून घेऊन कापून घ्या. एका कढईमधे तूप गरम करून [...]
The post Pakatle Shankarpali Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.