बटाटा-पोहे कटलेट: बटाटा-पोहे कटलेट हे नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात सूप बरोबर ब्रेड sandwich बनवून द्यायला छान आहे. हे कटलेट बनवतांना उकडलेले बटाटे, पोहे भिजवून त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, मीठ, गरम मसाला घालून बनवले आहेत. अश्या प्रकारचे कटलेट ब्रेड sandwich बनवून द्यायला चांगले आहेत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १५ साहित्य: ४ मोठे बटाटे २ कप जाडे पोहे १/४ कप बेसन ४ हिरव्या मिरच्या १ टे स्पून आले-लसूण पेस्ट मीठ चवीने १ टी स्पून गरम मसाला १ टी स्पून लाल मिरच्या पावडर एक चिमुट खायचा सोडा २ ब्रेड स्लाईस तेल कटलेट तळण्यासाठी Batata Poha Cutlets कृती: बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. पोहे ५-७ मिनिट भिजवून घ्या. मग उकडलेले बटाटे, पोहे, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, बेसन, मीठ, गरम मसाला, लाल मिरची पावडर, खायचा सोडा मिक्स करून चांगले मळून घ्या. मग त्याचे १५ एक सारखे गोळे बनवून घ्या व ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्या. नॉन स्टिक तवा गरम करून बनवलेले गोळे शालो फ्राय करा.
The post Batata Poha Cutlets Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.