इटालीयन चीज मँक्रोनी बॉल्स: ही एक छान स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. तसेच लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा घरी छोट्या पार्टीला बनवायला छान आहे. मँक्रोनी तर सर्वाना आवडते त्याचे बॉल्स बनवतांना पांढरा सॉस बनवून त्यामध्ये हे बॉल्स बनवले आहेत. An English language version of a similar recipe for making Italian Cheese Macaroni Balls can be seen here – Recipe for Cheese and Macaroni Balls बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ टे स्पून मैदा १०० ग्राम मँक्रोनी ४ टे स्पून चीज १ कप दुध २ टे स्पून बटर १ टी स्पून मिरीपूड १ टी स्पून ऑरगॅनो १ टी स्पून चिली फ्लेक्स २ ब्रेड स्लाईस (क्रम बनवायला) १ कप कॉर्नफ्लोर मीठ चवीने तेल चीज मँक्रोनी बॉल्स तळण्यासाठी Italian Cheese Macaroni Balls कृती: मध्यम आकाराच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडे मीठ घालून मँक्रोनी घालून शिजवून घ्या. एक नॉन स्टिक कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये मैदा घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये दुघ घालून मिक्स करून घेऊन एक सारखे हलवत रहा म्हणजे गुठळी होणार नाही. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स,मिरी पावडर व १ टे स्पून चीज घालून मिक्स करून घेऊन मिश्रण थोडेसे घट्ट होई परंत मंद विस्तवावर ठेवा. मग तयार झालेला सॉस एक [...]
The post Italian Cheese Macaroni Balls Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.