टूटी फ्रूटी आईसक्रिम: टूटी फ्रूटी आईसक्रिम हे चवीस्ट लागते. तसेच दिसायला पण सुंदर दिसते. हे आईसक्रिम बनवायला सोपे आहे. ह्यामध्ये कस्टर्ड पावडर, केशरी रंग, टूटी फ्रूटी, व व्हनीला इसेन्स वापरले आहे. लहान मुलांना टूटी फ्रूटी आईसक्रिम खूप आवडते. The English language version of this recipe can be seen here – Tutti Frutti Ice Cream टूटी फ्रूटी आईसक्रिम: टूटी फ्रूटी आईसक्रिम हे चवीस्ट लागते. तसेच दिसायला पण सुंदर दिसते. हे आईसक्रिम बनवायला सोपे आहे. ह्यामध्ये कस्टर्ड पावडर, केशरी रंग, टूटी फ्रूटी, व व्हनीला इसेन्स वापरले आहे. लहान मुलांना टूटी फ्रूटी आईसक्रिम खूप आवडते. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट सेट करण्यासाठी वेळ ४-५ तास वाढणी : ४-५ जणांना साहित्य: १ लिटर दुध (म्हशीचे) १/२ कप साखर १ १/२ टे स्पून कस्टर्ड पावडर १/२ कप फ्रेश क्रीम २ थेंब केशरी रंग (खाण्याचा) २ टे स्पून टूटी फ्रूटी ३-४ थेंब व्हनीला ईसेन्स किंवा फ्रुट ईसेन्स कृती: एका जाड बुडाच्या भांड्यात दुध व साखर मिक्स करून गरम करायला ठेवा. दुध मंद विस्तवावर १५-२० मिनिट ठेवा. म्हणजे ते थोडे घट्ट होईल. मग ते थंड करायला ठेवा. दुधाचे दोन भाग करून घ्या. एका भाग बाजूला ठेवा. व दुसऱ्या भागात कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. कस्टर्ड घट्ट होत आले की विस्तव बंद करून कस्टर्ड थंड [...]
The post Tasty Tutti Frutti Ice Cream in Marathi appeared first on Royal Chef Sujata.