कच्ची कैरी -पुदिना चटणी: उन्ह्नाला चालू झालाकी कैरी व आंब्याचा सीझन चालू होतो. मग आपण कैरीचे नाना विध पदार्थ बनवत असतो. कैरीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनतात. तसेच जेवणात चटणी असली की पदार्थाला छान चव येते. कैरीची आंबटगोड चटणीने छान चव येते. महाराष्ट्रील कोकण ह्या भागात कच्या कैरी पासून बऱ्याच प्रकारच्या चटण्या बनवतात. आपल्याला माहीत आहे का की कैरीही खूप गुणकारी आहे. कैरीमध्ये अशे गुणधर्म आहेत की तिच्या सेवनाने आपले शरीरातील रक्त शुद्ध होते. पचनाचा त्रास होतो म्हणजेच गॅसचा त्रास होतो त्यांना कैरी खाणे हे फायदेशीर आहे. कैरीचा अजून एक छान गुणधर्म आहे तो म्हणजे ज्यांना मधुमेहचा त्रास आहे त्यांची शरीरातील साखर नियंत्रणात येते. अजून एक छान फायदेमंद उपाय तो म्हणजे कैरी सेवनाने आपले केस छान चमकदार होतात. कैरी बरोबर पुदिना सुद्धा गुणकारी आहे. पुदिना च्या सेवनाने पचन चांगले होते. पुदिना मुळे लिव्हर चांगले साफ होते. आपली मेमरी लॉस पण सुधारते. आपले वजन सुद्धा नियंत्रणात येते. चटणी बनवण्या साठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ छोटी कच्ची कैरी १ कप कोथंबीर १/४ कप पुदिना पाने २-३ हिरव्या मिरच्या २ टी स्पून साखर मीठ चवीने Raw Mango Chutney with Mint Leaves कृती: प्रथम कैरी धुवून साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. कोथंबीर व पुदिना धुवून चिरून घ्या. मग कैरी, पुदिना, कोथंबीर [...]
↧