सकाळ टाईम्सची पाककला स्पर्धा गंगा ऑर्चड ऑप. हौसिंग सोसायटी, कोरेगावपार्क, मुंढवा रोड, पुणे येथे दिनांक ९ जून २०१८ शनिवार संध्याकाळी ५ वाजता आयोजित केली होती. पाककला स्पर्धा बरोबर लहान मुलांसाठी डान्सची स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. पाककला व डान्स स्पर्धाचे नियोजन श्री जाधव, श्री वाघ, श्री गाडेकर, श्री गावडे व त्यांचे अजून सहकारी यांनी खूप छान केले होते. तसेच श्री शिंदे यांनी anchoring चे काम छान केले होते. सकाळ समूह नेहमी समाजात वेगवेगळ्या स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करीत असतात, आजकालच्या जलद जीवन शैली मध्ये कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही का कोणाला कोणाकडे जायला यायला सुद्धा वेळ नाही. सकाळ उद्योग समुहाचा ह्या मागचा हेतू हाकी सोसायटीमधील रहीवाशानी एकत्र येऊन सगळ्यामध्ये एकोपा ठेवावा. आजकाल प्रतेक सोसायटी मध्ये विविध प्रांतातील लोक रहात असतात व अश्या स्पर्धा घेतल्या तर लोकांच्या ओळखी होऊन चांगले संबध होतील. Sakal Cooking Competition Ganga Orchard Society Cooking Competition Ganga Orchard Society Prize Distribution Sakal Cooking Competition Ganga Orchard Society, Pune पाककला स्पर्धे मध्ये जवळपास ४० महिलांनी भाग घेतला होता. पाककला स्पर्धे मध्ये महिलांनी चवीस्ट पदार्थ बनवून सजावट खूप छान पद्धतीने केली होती. स्पर्धेमध्ये काही महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ अनारसे, पुरणपोळी, काही पाश्चात्य पदार्थ केक, पंजाबी वेगवेगळे पदार्थ, बंगाली, चायनीज, गुजराती पदार्थ अश्या नानाविध डिशेश बनवल्या होत्या व त्यातून ५ डिशेश [...]
↧