मासवड्या : मासवड्या ह्या जेवणामध्ये साईड डीश म्हणून बनवता येतात. ह्या वड्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. तसेच ही पूर्वीच्या काळातील डीश आहे. ह्या वड्या बनवायला जरा वेळ लागतो पण खूप टेस्टी लागतात. तसेच त्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक सुद्धा आहेत. ह्या वड्यांचे आपण कालवण सुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १२-१५ वड्या साहित्य: सारणासाठी: १ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून) ७-८ लसून पाकळ्या (बारीक चिरून) १” आले तुकडा (बारीक चिरून) १ हिरवी मिरची (बारीक चिरून) १ टे स्पून तीळ १ टी स्पून खसखस २ टे स्पून सुके खोबरे (किसून) २ टे कोथंबीर (धुवून बारीक चिरून) १ टी स्पून धने-जिरे पावडर १/२ टी स्पून गरम मसाला १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद १/८ टी स्पून हिंग मीठ चवीने १ टे स्पून तेल आवरणासाठी: १ कप बेसन १ टे स्पून तेल १ टी स्पून लाल मिरची १/४ टी स्पून हळद १ टी स्पून लसून (पेस्ट) मीठ चवीने Khamang Maswadi कृती: सारणासाठी: कांदा. आले-लसून-हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. कोथंबीर धुवून कोरडी करून बारीक चिरून घ्या. एका कढईमधे किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून बाजूला ठेवा. मग तीळ व खसखस कोरडी भाजून बाजूला ठेवा. त्याच कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसून, हिरवी मिरची घालून गुलाबी रंगावर [...]
↧