Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Red Rose Coconut Ladoo Recipe in Marathi

$
0
0
रेड रोज कोकनट लाडू: रोज सिरप कोकनट लाडू हे आपण कधीपण झटपट बनवू शकतो. अश्या प्रकारचे लाडू बनवतांना डेसीकेटेड कोकनट व कंडेन्स मिल्क व रोज सिरप वापरले आहे. हे लाडू दिसायला व चवीला सुद्धा छान लागतात. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: १२ बनतात साहित्य: २ कप डेसीकेटेड कोकनट १/२ कप कंडेन्स मिल्क २ टे स्पून दुध १/४ टी स्पून रोज इसेन्स २ टे स्पून रेड रोज सिरप १ टी स्पून तूप सजावटी साठी ड्रायफ्रुट Red Rose Coconut Ladoo कृती: प्रथम कंडेन्स मिल्क बनवून घ्या. एका कढईमधे एक चमचा तूप घालून डेसीकेटेड कोकनट १० मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. पण भाजताना सारखे हलवत रहा त्याचा रंग बदलला नाही पाहिजे. एका बाऊल मध्ये कंडेन्स मिल्क, दुध, रोज इसेन्स व रेड रोज सिरप चांगले मिक्स करून घ्या. मग भाजलेल्या डेसीकेटेड कोकनटमध्ये कंडेन्स मिल्कचे मिश्रण घालून मिक्स करून परत ५ मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या, विस्तव बंद करून भांडे उतरवून ठेवा. थंड झाल्यावर त्याचे एक सारखे लाडू वळून घ्या. टीप: कंडेन्स मिल्क बनवतांना अर्धा लिटर दुध गरम करून त्यामध्ये ३/४ कप साखर व एक चिमुट खायचा सोडा घालून घट्ट होईस्तोवर आटवून घ्या.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles