पनीर मस्तानी: पनीर मस्तानी ही एक जेवणामध्ये बनवायला छान खमंग डीश आहे. ही डीश बनवतांना पनीर, उकडलेले बटाटे व डाळींबाचे दाणे वापरून ग्रेवी बनवली आहे. घरी पार्टी असेल अथवा सणावाराला सुद्धा बनवायला छान आहे. आपण ह्या आगोदर पनीरच्या बऱ्याच डिशेश पाहिल्या आहेत. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी Khamang Paneer Mastani Recipe साहित्य: १०० ग्राम पनीर ३ मध्यम आकाराचे बटाटे २ टे स्पून कॉर्नफ्लोर १/२ कप डाळीबाचे दाणे १ टे स्पून आले-लसूण पेस्ट ३ टे स्पून काजू पेस्ट १ टे स्पून फ्रेश क्रीम १/२ टी स्पून वेलचीपूड मीठ व साखर चवीने १ टी स्पून कसुरीमेथी पावडर १ टे स्पून बटर १ टी स्पून गरम मसाला (गरम मसाला करीता: ५-६ मिरे, १ जावीत्री फुल, ४ लवंग, ४ हिरवे वेलदोडे, ३ तमलपत्र, १-२ दालचीनी तुकडे हे सर्व थोडेसे भाजून पूड करावी) १/२ कप दुध तेल तळण्यासाठी कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्यावेत.पनीर किसून घ्यावे, त्यात वेलचीपूड, मीठ, कॉर्न फ्लोर, घालून गोळा करून घ्यावा. मग त्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून त्यामध्ये डाळीबाचे दाणे भरून गोळा बंद करून गरम तेलामध्ये ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत. कढईमधे टेक गरम करून त्यामध्ये आले-लसून पेस्ट, १ काजू पेस्ट परतून घ्या मग त्यामध्ये दुध घालून फ्रेश क्रीम, गरम मसाला, वेलचीपूड, कसुरी मेथी, घालून उकळी आली की बटर [...]
↧