हरियाली स्वीटकॉर्न राईस: हरियाली स्वीटकॉर्न राईस ही एक जेवणातील चवीस्ट डीश आहे. हरियाली स्वीटकॉर्न राईस बनवण्यासाठी कोथंबीर, पुदिना, स्वीटकॉर्नचे दाणे, व दही वापरले आहे. अश्या प्रकारचा भात आपण सणावाराला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. टेबलावर दिसायला सुद्धा छान दिसतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी Hariyali Sweet Corn Rice साहित्य: ४-५ कप मोकळा शिजवलेला भात १ १/२ कप स्वीटकॉर्नचे दाणे १/२ कप कोथंबीर १ टे स्पून आले-लसून पेस्ट १ टे स्पून गरम मसाला २ टे स्पून पुदिना २ टे स्पून दही १ डाव तेल १ टी स्पून जिरे ४-५ हिरव्या मिरच्या मीठ चवीने कृती: प्रथम तांदूळ धुवून मोकळा भात शिजवून घेवून बाजूला ठेवा. स्वीटकॉर्नचे दाणे वाफवून घ्या. कोथंबीर, आले-लसून, पुदिना, दही , हिरवी मिरची हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात जिरे घालून वाटलेला हिरवा मसाला घालून थोडा परतून घ्या. मीठ व स्वीटकॉर्नचे दाणे घालून परत परतून घ्या. मग त्यामध्ये गरम मसाला शिजवलेला भात घालून हळुवारपणे हलवून भातावर झाकण ठेवून एक छान वाफ येवू द्या. गरम गरम हरियाली स्वीटकॉर्न राईस रायत्या बरोबर सर्व्ह करा.
↧