आलू माखणे भाजी: मखाने आलू भाजी ही. पंजाब, गुजरात ह्या भागामध्ये अश्या प्रकारची भाजी बनवतात. माखणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनी हितावह आहेत. त्यामध्ये अनेक पोषकतेचे गुण आहेत. आलू-माखणे ग्रेव्ही बनवतात मखाने, बटाटे, टोमाटो व मसाला वापरला आहे. माखणे रोज खाणे हितावह आहेत तसेच बनवायला सोपी आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ कप माखणे ८ छोटे बटाटे १ टोमाटो, ७-८ काजू (बारीक कुटून) १ टे स्पून तेल १ टे स्पून फ्रेश क्रीम मीठ चवीने मसाला करीता: २ मोठे कांदे १ टी स्पून तेल ७-८ लसून पाकळ्या १” आले २ हिरव्या मिरच्या १ टी स्पून बडीशेप (कुटून) १ टी स्पून धने-जिरे पावडर १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद फोडणी करीता: १ टी स्पून तेल १/२ टी स्पून शहाजिरे १/४ टी स्पून कसुरीमेथी माखणे आलू भाजी कृती: एका कढईमधे १ टे स्पून गरम करून त्यामध्ये मखाने घालून ५ मिनिट मंद वास्तवावर परतून घ्या. कांदे चिरून घ्या, टोमाटो उकडून त्याची प्युरी करून घ्या. बडीशेप कुटून घ्या. बटाटे उकडून सोलून घ्या. मसाला करीता: एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदे, आले-लसून, हिरव्या मिरच्या घालून ५ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये शहाजिरे व कसुरी मेथी [...]
The post Aloo Makhana Bhaji Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.