अंड्याचे कबाब: अंड्याचे कबाब ही एक टेस्टी डीश आहे. एग कबाब हे आपण स्टारटर म्हणून किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पुण्यामध्ये ह्या डीशला अंड्याचे कबाब व मुंबईला बैद्याचे कबाब म्हणतात. अंड्याचे कबाब बनवतांना सारणासाठी उकडलेले अंडे, मिरे पावडर, मीठ व पुदिना वापरला आहे. मिरे पावडर ही थोडी जाडसर घालायची त्याने छान चव येते. पुदिना चिरून वापरला आहे त्यामुळे कबाबला चांगली टेस्ट येते व छान सुंगध येतो. अंड्याचे कबाबाचे आवरण हे उकडलेल्या बटाट्याचे आहे त्यामध्ये चवीसाठी आले-हिरवी मिरची पेस्ट वापरली आहे व ब्रेडचा चुरा वापरला आहे. त्यामुळे कबाब छान कुरकुरीत होतात व फुटत नाहीत. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ८ कबाब साहित्य: आवरणासाठी: ४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून) १ टे स्पून आले-हिरवी मिरची पेस्ट २ ब्रेड स्लाईस (चुरा करून) १/२ टी स्पून लिंबूरस मीठ चवीने सारणासाठी: २ अंडी (उकडून) १/४ टी स्पून मिरे पावडर (जाडसर) १ टे स्पून पुदिना पाने (चिरून) मीठ चवीने Eggs Kabab कृती: बटाटे व अंडी उकडून घ्या. ब्रेडचा चुरा करून घ्या. आवरणासाठी: बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. मग त्यामध्ये आले-हिरवी मिरची पावडर, लिंबूरस, ब्रेडचा चुरा, मीठ घालून चांगले मळून घेवून त्याचे आठ एकसारखे भाग करा. सारणासाठी: अंडी उकडून, सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्या. मग त्यामध्ये मिरे पावडर (जाडसर), मीठ व चिरलेला पुदिना पाने घालून मिक्स करून घ्या [...]
↧