मसूरच्या डाळीची खिचडी: मसूरच्या डाळीची खिचडी आपण मुख्य जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कधी कंटाळा आला की अश्या प्रकारची खिचडी झटपट बनवू शकतो. ही खिचडी बनवण्यासाठी मसूरची डाळ, तांदूळ, आले-लसून पेस्ट, गरम मसाला, कांदा वापरला आहे. खिचडी बरोबर आपण पापड व लोणचे सर्व्ह करू शकतो मग चपाती भाजी नसेल तरी चालेल. बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ कप तांदूळ (कोलम किंवा बासमती) १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून) १ टे स्पून आले=लसून पेस्ट १ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद १ १/२ टी स्पून गरम मसाला मीठ चवीने १/४ कप कोथंबीर (चिरून) फोडणीकरीता: २ टे स्पून तेल १ तमालपत्र ७-८ काळे मिरे १ टी स्पून शहाजिरे १ छोटा तुकडा दालचीनी Maharashtrian Masoor Dal Khichdi कृती: प्रथम तांदूळ व मसूरडाळ धुवून अर्धातास बाजूला ठेवा. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या. आले-लसून पेस्ट कुतू घ्या. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा.करून त्यामध्ये तमालपत्र, मिरे, शहाजिरे, दालचीनी तुकडा घालून चिरलेला कांदा घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसून पेस्ट घालून परतून घेवून धुतलेले तांदूळ घालून २ मिनिट परतून घेऊन हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला,मीठ, कोथंबीर घालून मिक्स करून ५ कप गरम पाणी घालून मिक्स करून घ्या. कुकरचे झाकण लाऊन दोन शिट्या काढून घ्या. कुकर थंड झाला की [...]
The post Tasty Maharashtrian Masoor Dal Khichdi Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.