कडवे/ गोडे वालाची आमटी/ बिरड्याची आमटी: वालाची आमटी ही छान खमंग व चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण वालाची खिचडी व वालाची उसळ पाहिली. ह्या दोन्ही रेसिपी फार रुचकर लागतात. वालाची आमटी ही कोकण भागातील फार लोकप्रिय आमटी आहे. अश्या प्रकारची आमटी बनवतांना ओल्या नारळाचा मसाला व आमसूल वापरला आहे. वालाची आमटी बनवण्यासाठी आगोदर वाल ७-८ तास भिजत घालून मग पाणी काढून त्याला चांगले मोड आले की ते सोलून त्याची आमटी बनवतात. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ कप सोललेले वाल १ छोटा बटाटा ७-८ काजू २ आमसूल १ टी स्पून गरम मसाला २ टे स्पून कोथंबीर (चिरून) मीठ चवीने ओला मसाला करीता: १ टी स्पून तेल १ छोटा कांदा (उभा चिरून) ७-८ लसून पाकळ्या, १” आले तुकडा १ कप ओला नारळ (खोवलेला) १ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर फोडणी करीता: १ टे स्पून तेल/तूप १ छोटा कांदा (चिरून) १/४ टी स्पून हिंग १/४ टी स्पून हळद Kadve Gode Valachi Amti कृती: वाल भिजवून, मोड आणून सोलून घ्या. मग थोडे पाणी वापरून अर्धवट उकडून घ्या. कांदा व कोथंबीर चिरून घ्या. बटाटा सोलून त्याच्या फोडी करून घ्या. ओल्या मसाला करीता: प्रथम कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा व लसून गुलाबी रंगावर परतून त्यामध्ये आले व ओला नारळ घालून [...]
The post Kadve/ Gode Valachi Amti Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.