चीज टोमॅटो राईस: चीज टोमॅटो राईस ही एक जेवणामध्ये एक छान डीश आहे. तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगली आहे. टोमॅटो राईस चा रंग छान दिसतो व त्याची चव आंबट गोड अशी लागते. चीज वापरल्याने भात चवीस्ट लागतो. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिटे वाढणी: २ जण साहित्य: १ कप टोमॅटो घट्ट रस १ कप तांदूळ (बासमती किंवा आंबेमोहर) १ कप चीज (किसून) मीठ चवीने ३/४ कप पाणी फोडणीसाठी: १ टे स्पून साजूक तूप ४ लवंग २-३ हिरवे वेलदोडे ६ मिरे cheese tomato rice कृती: तांदूळ धुवून एक तास बाजूला ठेवा. ३ मध्यम आकाराचे टोमाटो गरम पाण्यात घालून पाच मिनिट ठेवा मग टोमॅटोची साले काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. चिज किसून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून लवंग, वेलदोडे, मिरे घालून धुतलेले तांदूळ घालून पाच मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये १/२ कप चीज, १/२ कप टोमॅटो प्युरी, ३/४ कप गरम पाणी, चवीने मीठ घालून मिक्स करून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून मंद विस्तवावर भात शिजू द्या. भात शिजल्यावर राहिलेले चीज, राहिलेली टोमॅटो प्युरी घालून मिक्स करून पाच मिनिट मंद विस्तवावर भात शिजू द्या.
↧