Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi

$
0
0

खुसखुशीत महाराष्ट्रियन बेक्ड मँगो करंजी: आंबा हा फळांचा राजा तो सगळ्यांना खूप आवडतो. त्याचे कोणतेही पदार्थ बनवले तरी अप्रतीम लागतात. ह्या आगोदर आपण आंब्याचे आईसक्रिम, मिल्कशेक, मस्तानी, कस्टर्ड, लस्सी, मोदक आता आपण करंज्या कश्या बनवायच्या ते बघूया. अश्या प्रकारच्या करंज्या आपण सणावाराला इतर वेळी किंवा दिवाळी फराळसाठी बनवू शकतो. अगदी सोप्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत कारण साजूक तूप वापरून फक्त बेक केल्या आहेत डीपफ्राय केल्या नाहीत. आंब्याचे बरेच गुणधर्म आहेत व तो औषधी पण आहे.जेवतांना आंबा खाल्याने मेद वाढतो, हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व कफवृद्धी होत नाही. दुध मिक्स करून आंबा खाल्याने वीर्यवृद्धी चांगली होते. आंबे खाणे म्हणजे आतड्यासाठी एक प्रकारचे उत्तम प्रकरचे औषध आहे. चांगला पिकलेला आंबा खाल्याने जठरातील पचनाचे रोग, फुफुसाचे रोग तसेच रक्त कमी असणारे रोग बरे होतात. चांगले पिकलेले आंबे खाल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी होते, आळस दूर होतो व रस धातू मुबलक प्रमाणात होतो. क्रिस्पी बेक मँगो करंजी बनवतांना सारणाकरीता ओला नारळ, आंब्याचा रस, दुध, साखर व ड्राय फ्रुट वापरले आहेत व आवरणासाठी मैदा, आंबारस, पिठीसाखर, मीठ, तूप वापरले आहे. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट बेक करण्यासाठी वेळ: ५० मिनिट वाढणी: १५-१७ बनतात साहित्य: सारणाकरीता: १ कप ओला नारळ (खोऊन) १ कप दुध १ कप हापूस आंब्याचा रस १/२ कप साखर ड्रायफ्रुट सजावटीसाठी [...]

The post Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.


Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles