राजस्थानी बेसन गट्टे का साग किंवा भाजी: राजस्थान मधील ही एक पारंपारिक लोकप्रिय डिश आहे. ही भाजी छान खमंग चमचमीत लागते. घरात कधी भाजी नसेलतर अश्या प्रकारची निराळी भाजी बनवता येते. गट्टे म्हणजे बेसन पासून बनवतात व ते उकडून फ्राय करून त्याची भाजी बनवतात. आपल्या घरी कोणी अचानक पाहुणे आलेतर अश्या प्रकारची भाजी बनवतात येते राजस्थानी भाज्या ह्या फार तिखट किंवा मसालेदार नसतात त्यामुळे लहान मुले सुधा आवडीने खातात. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा ऑफिसमध्ये जातांना टिफीनमध्ये न्यायला पण मस्त आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: गट्टे बनवण्यासाठी १ १/२ कप बेसन (डाळीचे पीठ) २ टी स्पून धने-जिरे पावडर एक चिमुट सोडा १/२ टी स्पून हिंग १ टी स्पून लाल मिरची पावडर १/२ टी स्पून हळद मीठ चवीने २ टे स्पून तेल (कडकडीत मोहन) भाजी करीता: २ मध्यम आकाराचे कांदे (चिरून) २ मध्यम आकाराचे टोमाटो (चिरून) १ टी स्पून लाल मिरची पावडर (किंवा चवीने) २ कप पाणी मीठ चवीने फोडणी करीता: २ टे स्पून तेल १ टी स्पून मोहरी १ टी स्पून जिरे १/२ टी स्पून हिंग १/२ कप सुके खोबरे (किसून) १/२ कप कोथंबीर (चिरून) Besan Gatte Ki Sabzi कृती:गट्टे बनवण्यासाठी: प्रथम एका बाउलमध्ये बेसन, धने-जिरे पावडर, लाल मिरची पावडर, अन चिमुट खायचा सोडा, हिंग, [...]
The post Rajasthani Besan Gatte Ki Sabzi Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.