स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळी: पाकातील चंपाकळी ही एक छान गोड डिश आहे ती आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो. ही छान चवीस्ट आकर्षक कुरकुरीत लागते. बनवायला सोपी आहे तसेच करंजीला एक पर्याय म्हणून सुद्धा मस्त आहे. चंपाकळी बनवतांना बारीक रवा किंवा मैदा वापरा व पाकामध्ये रंग, वेलचीपूड व लिंबूरस घालून बनवली आहे. चंपाकळीला गावजास सुद्धा म्हणतात. ह्याचा नाजूकपणा आपण पुरी कापण्यावर आवलंबून आहे. पुरीला कट करताना अगदी जवळ जवळ कापून छान मुडपून घेवून तळताना नीट हलवून अलगद तुपामध्ये सोडा म्हणजे ती चान मोकळी होईल व चंपाकळी सुंदर दिसेल. महाराष्टात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पद्धत आहे तेव्हा रुखवतात ठेवायला सुद्धा छान आहेत किंवा गौरी गणपतीच्या वेळी आरस करून फराळाचे पदार्थ ठेवतात त्यामध्ये सुद्धा अश्या प्रकारचा पदार्थ ठेवता येतो दिसायला सुंदर दिसेल. स्वीट पाकातील कुरकुरीत चंपाकळीची रेसिपी आमच्या विडीओ च्यानलवर सुद्धा दिलेली आहे त्यासाठी येथे पहा. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २५ बनतात साहित्य: २ कप बारीक रवा १ टे स्पून तेल (कडकडीत) मीठ चवीने तूप चंपाकळी तळण्यासाठी साखरेच्या पाकासाठी: १ १/२ कप साखर १/४ कप पाणी १ टी स्पून वेलचीपूड २ थेंब केशरी रंग १ टी स्पून लिंबूरस चंपाकळी बनवतांना Sweet Pakatli Kurkurit Champakali कृती: प्रथम बारीक रवा एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये गरम कडकडीत मोहन व मीठ घालून [...]
The post Sweet Pakatli Kurkurit Champakali Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.