जन्माष्टमी नेवेद्यसाठी गोपाळ काला रेसिपी: श्रावण महिना आला की महाराष्टात सणाची सुरवात होते सगळीकडे हिरवेगार व आनंदी आनंद असतो. श्रावण महिन्यातील प्रतेक सण उस्ताहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण जयंती ह्या दिवशी बाळ कृष्ण यांचा जन्म दिवस ह्यादिवशी पूर्ण दिवस उपवास रात्र जागवून श्रीकृष्णाची गाणी म्हणून रात्री १२ वाजता कृष्ण जन्म झाला की मग उपवास सोडतात. श्रीकृष्ण जन्म झालाकी दुसऱ्या दिवशी गोपाळ काला हा दिवस ह्या दिवशी दही हंडी हा तरुणांचा मोठा सण. ह्या दिवशी खूप उंच दही हंडी बांधली जाते व प्रतेक तरुणाचे ध्येय म्हणजे किती कठीण असल अशक्य असल तरी एक मेकांच्या जोरावर प्रयन्त करून आपले ध्येय गाठून दहीहंडी फोडायची ह्यामध्ये आपल्याला असे दिसते की आपण कोणते सुद्धा ध्येय साध्य करायचे असेल तर एकी हेच बळ आहे. श्रीकृष्ण हा गरीब लोकांचा रक्षणकर्ता आहे. कर्माची कर्तव्याची जाणीव करू देणारा होता. सत्यासाठी तो जगला. म्हणून त्याची जयंती देशभर साजरी करतात. श्रीकृष्ण ह्यांना दही व दुधाचे पदार्थ खूप आवडतात. गोपाळ काला हा पदार्थ खूप प्रिय. गोपाळ काला कसा बनवायचा ह्याची रेसिपी देत आहे. नेवेद्या साठी नक्की बनवा. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ कप पोहे १/२ कप चुरमुरे १/२ कप दही १/४ कप काकडी (चोचून) २ टे स्पून कोथंबीर (चिरून) २ टे स्पून ओला नारळ (खोऊन) साखर व मीठ [...]
↧