टेस्टी होम मेड व्हेज बर्गर: टेस्टी होम मेड व्हेज बर्गर ही मुलांची अगदी आवडती डीश आहे. हे बर्गर बनवतांना पुदिना चटणी वापरली आहे पुदिनामध्ये जीवनसत्व “ए” भरपूर असते तसेच पुदिना आपल्या आरोग्याला खूप गुणकारी आहे जगातील सर्व रोगांना मुक्ती देणारा आहे असे मानतात. टोमाटो सॉस व टोमाटो स्लाईस वापरली आहे. टोमाटो मध्ये आपल्या शरीराला लागणारे सर्व घटक लोह, क्षार भरपूर प्रमाणात आहे. काकडी ही आपल्या शरीराला थंड असते. चीज मुलांनातर प्रिय असतेच व ते गुणकारी सुद्धा आहे. बर्गर मध्ये बटाट्याची टिक्की वापरली आहे. टिक्की बनवतांना बटाटे, आले-हिरवी मिरची, ब्रेडचा चुरा, कोथंबीर, लिंबूरस वापरला आहे. तसेच बन लोण्यामध्ये भाजले आहेत त्यामुळे छान खमंग व चवीस्ट लागतात त्यामुळे बर्गरला चांगली चव येते. त्यामुळे मुलांचे पोट सुद्धा भरते. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ८ बर्गर बनतात साहित्य: ८ लादी पाव किंवा बन ८ आलू टिक्की किंवा पॅटीस (रेसिपी पहा) १ कप पुदिना चटणी (रेसिपी पहा) १/२ कप टोमाटो केचप १ मोठ्या आकाराची काकडी १ मोठ्या आकाराचा टोमाटो ३ चीज क्यूब १/२ कप बटर (लोणी) Tasty Veg Burger कृती आलू टिक्की अथवा पॅटीस बनवून घ्या त्याची रेसिपी दिलेली आहे ती बघा. पुदिना चटणी बनवून घ्या त्याची रेसिपी दिलेली आहे ती बघा. काकडी टोमाटो धुवून त्याचे गोल गोल चकती कापून घ्या. २ चीज क्यूबचे ८ [...]
↧