आंब्याचा फज: Mango Fudge ही एक स्वीट डिश आहे. आंब्याच्या रसाचे कोणतेही पदार्थ छान लागतात. आंब्याचा फज बनवतांना ओला खोवलेला नारळ, दुध, आंब्याचा रस, साखर, खवा व ड्राय फ्रुट वापरले आहे. ही डिश थंड करून सर्व्ह करावी त्याने त्याची चव फार छान लागते. The English language version of this Mango Burfi recipe preparation method can be seen here- Mango Fudge Burfi बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: दोन कप ओला नारळ (खोऊन) एक कप दुध एक कप साखर एक कप आंब्याचा रस एक कप खवा ड्राय फ्रुट तुकडे सजावटीसाठी Mango Fudge कृती: एका कढईमधे खोवलेला नारळ व दुध मिक्स करून पाच मिनिट मिश्रण शिजवून घ्या. साखर घालून सात ते दहा मिनिट मिश्रण शिजवून घ्या. मग त्यामध्ये आंब्याचा रस व खवा घालून मिक्स करून थोडे घट्ट होई परंत शिजवून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन शिजवलेले मिश्रण प्लेटमध्ये ओतुन एक सारखे पसरून त्यावर ड्राय फ्रुटचे तुकडे घालून सजवा. प्लेट सजवल्या वर फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवा. आंब्याचा फज थंडच सर्व्ह करा.
↧