टोमाटो वडी: टोमाटो वडी ही टेस्टी व दिसायला आकर्षक दिसते. टोमाटो वड्या ह्या चवीला छान आंबटगोड लागतात. आपण ह्या वड्या दिवाळी फराळाला सुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: २५ वड्या साहित्य: ३ कप नारळ (खोऊन) ३ मोठे टोमाटो १ १/२ कप साखर १ टी स्पून वेलचीपूड २ टे स्पून पिठीसाखर १ टी स्पून तूप Tomato Vadi कृती: टोमाटो धुऊन घ्या, मग उकडून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊन मग गाळून घ्या. नारळ खोऊन घ्या. एका स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन घ्या. एका कढईमध्ये खोवलेला नारळ, टोमाटो पेस्ट, साखर मिक्स करून मंद विस्तवावर शिजत ठेवा. मधून मधून हलवत रहा. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करा. मिश्रण इतके घट्ट झाले पाहिजे की आपले उलथने मिश्रणामध्ये उभे राहिले पाहिजे. मिश्रण घट्ट व्हायला आले की त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून मिश्रण स्टीलच्या प्लेटमध्ये एक सारखे थापून घ्या. वरतून पाहिजे असल्यास ड्रायफ्रुटने सजवा. मग त्याच्या शंकरपाळी सारख्या वड्या कापून घ्या.
↧