हैदराबादि चिकन ग्रेवी: हैदराबादि चिकन ग्रेवी ही एक चवीस्ट डीश आहे. चिकन ग्रेवी बनवतांना मसाला जास्त वापरला नाही. ही ग्रेवी बनवतांना कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना, लाल मिरची पावडर व गरम मसाला वापरला आहे. खसखस व बदाम वापरले आहे त्यामुळे ग्रेवीला छान घट्ट पणा येतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ५०० ग्राम चिकन १ मोठा कांदा २ टोमाटो (उकडून) २ टी स्पून लाल मिरची पावडर १ टी स्पून गरम मसाला १/२ टे स्पून धने-जिरे पावडर ६ बदाम (भिजवून) २ टे स्पून दुध व १० कड्या केसर (भिजत ठेवा) १ टे स्पून फ्रेश क्रीम १/२ वाटी दही १/२ टी स्पून हळद मीठ चवीने चिकन मुरवून ठेवण्यासाठी मसाला वाटुन: १ मध्यम आकाराचा कांदा १०-१२ लसूण पाकळ्या १” आले तुकडा ४ हिरव्या मिरच्या १ टे स्पून खसखस (भाजून) १/२ कप कोथंबीर १/४ कप पुदिना पाने २ टे स्पून तूप Hyderabadi Chicken Gravy कृती: कांदा, आले-लसूण, हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना पाने खसखस वाटून घ्या. टोमाटो उकडून, साले काढून मिक्सरमध्ये वाटुन घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. भिजलेले बदाम वाटून घ्या. केसर कोमट दुधामध्ये भिजत ठेवा. चिकन धुवून घ्या. चिकनला वाटलेला मसाला, दही, हळद व मीठ लाऊन मिक्स करून १५ मिनिट बाजूला ठेवा. कढईमधे तूप गरम करून कांदा घालून गुलाबी रंगावर [...]
↧