जिवतीची पूजा: श्रावण महिना चालू झाला की आपले सण वार चालू होतात. आपल्याला प्रसन्न वाटते, आपले मन, आपले घर, बाजूचा परिसर पण प्रसन्न वाटतो. आपल्याला उत्साह वाटायला लागतो. श्रावण महिन्यात प्रतेक दिवसाचे काहीना काही महत्व आहे. तसेच शुक्रवार सुद्धा महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजे बरोबर जिवतीची पूजा करायची प्रथा आहे. श्रावण महिना चालू झालाकी जिवतीचे चित्र देव्हार्या जवळ भिंतीवर लावावे. प्रतेक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. चित्राला रुईची माळ घालावी, हळद-कुंकू लावावे, हार किंवा फुले वाहावीत, तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावी. गोड पदार्थ नेवेद्य म्हणून ठेवावा. देवीची आरती म्हणावी. जिवती समोर आपल्या मुलांचे रक्षण कर असे म्हणावे, आपल्या मुलांचे आयुष्य सुखी जावे अशी प्राथना करावी. संद्याकाळी घरातील मुलांना ओवाळावे. मुले जर बाहेर गावी असतील तर घरात चारी बाजूनी आरती फिरवावी ती आरती आपल्या मुलांना पोचेल. Jivati chi Puja कोणत्याही शुक्रवारी पुरणाचा नेवेद्य दाखवून जिवतीच्या चित्रा समोर पुरणाचे दिवे लावावे. संद्याकाळी सवाष्ण बोलवावी तिची खणा-नारळाने ओटी भरावी. जिवती आपल्या मुलांचे रक्षण करते.
↧