उपवासाची खजुराची कचोरी: उपवासाची कचोरी ही एक छान डीश आहे. उपवास असला की आपण नेहमी त्याच त्याच डीश बनवतो ही एक चं ड्रायफ्रुट घालून बनवलेली डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १२ कचोरी बनतात साहित्य कचोरि भरण्यासाठी: २० खजूर १ टे स्पून खस-खस ६ जरदाळू (बारीक तुकडे करून) १ टी स्पून वेलचीपूड १ टे स्पून काजू पावडर आवरणसाठी : १ वाटी शिंगाडा पीठ वाटी १/२ वाटी साबुदाणा पीठ १ टे स्पून तेल (मोहन साठी) १ टी स्पून तीळ, मीठ तळण्यासाठी तेल/तूप Upvasachi Khajur Kachori कृती :– खजूर धुऊन बिया काढून मिक्सर मधून काढा. जरदाळूचे बारीक तुकडे करा. नंतर खजूर, जरदाळू, खस-खस, वेलचीपूड व काजू पावडर घालून गोळा बनवून घ्या. पोळपाटा वरती लाटून त्रिकोणी तुकडे करा. शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, गरम तेल, मीठ व थोडे कोमट पाणी घेऊन घट्ट पीठ मळून घ्या. त्याचे छोटे-छोटे गोळे करून लाटून त्याला त्रिकोणी आकार द्या. प्रत्येक त्रिकोणा मध्ये खजुराचा त्रिकोण ठेवून तीनही बाजूनी बंद करा. कढई मध्ये तेल/ तूप गरम करून कचोरी गुलाबी रंगावरती तळून घ्या.
↧