Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

लवंगाचे औषधी गुणधर्म

$
0
0
लवंगाचे औषधी गुणधर्म: लवंग हे मसाल्याच्या पदार्था मधील महत्वाचा पदार्थ मानला जातो. लवंगाने पदार्थाला सुंगंध येतो. लवंग हे मुखशुद्धी साठी सुद्धा उपयोग केला जातो. तसेच लवंगाचा औषधी बनवण्या साठी अथवा घरात औषध म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. लवंग ही दोन प्रकरची असतात. एक काळ्या रंगाची जी खूप तीव्र सुगंधी असतात ती खरी लवंग ओळखली जातात व ती उत्तम प्रतीची समजली जातात. दुसरी म्हणजे भुरकट रंगाची असतात त्यामधील तेल यंत्रा द्वारे काढून घेतले जाते. लवंगामुळे पदार्थाला चव येते. भात बनवतांना फोडणी मध्ये लवंग घातले जाते त्यामुळे भात स्वदिस्ट लागतो. लवंगा मधून काढलेले तेल खूप औषधी आहे. हे तेल बरीच औषध बनवण्यासाठी उपयोगी पडते. तसेच ते जंतुनाशक सुद्धा आहे. प्रवासामध्ये मळमळ होत असेल, उलटी येत असेल तर प्रवास करतांना तोंडामध्ये लवंग ठेवावे. दात दुखी साठी लवंग खूप उपयोगी आहे. लवंग हे तिखट, कडवट,थंड, पाचक, रुची निर्माण करणारे,कफ, उचकी व क्षय रोगावर गुणकारी आहे. खोकल्याची उबळ येत असेल तर लवंग तोंडात ठेवावे. त्यामुळे सर्दी सुद्धा कमी होते. बऱ्याच प्रमाणात सर्दी झाली असेल तर पाण्यात दोन लवंग घालून पाणी उकळून प्यावे. Cloves लवंगाचे तेल डोक्यावर चोळल्याने डोकेदुखी कमी होते. जर सांधेदुखी होत असेल तर लवंगाचे तेल चोळावे म्हणजे सांधेदुखी कमी होते. लवंगाच्या तेलाचे थेंब रुमालावर घालून मग हुंगावे म्हणजे सर्दी कमी होते. दात दुखत [...]

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Trending Articles