टेस्टी स्पायसी डाळ पराठा: डाळ पराठा हा नाश्त्याला, जेवतांना किंवा मुलांना डब्यात द्यायला पण चांगला आहे. चणाडाळ ही पौस्टिक आहेच. चणाडाळ पराठा बनवतांना डाळ वाटून घेवून तुपाच्या फोडणीत हिंग, लाल मिरची पावडर, धने पावडर वापरली आहे त्यामुळे छान टेस्टी लागतो. गरम गरम पराठ्या वर तूप घालून सर्व्ह करा. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ८ पराठा बनतात साहित्य: आवरणासाठी: २ कप गव्हाचे पीठ २ टे स्पून तूप मीठ चवीने सारणासाठी: १ १/२ कप चणाडाळ डाळ २ टे स्पून तूप १/२ टी स्पून हिंग १ टी स्पून धने-जिरे पावडर १ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर १ टी स्पून गरम मसाला १/४ कप कोथंबीर (चिरून) मीठ चवीने तेल पराठा भाजण्यासाठी तूप पराठ्याला वरतून लावण्यासाठी Chana Dal Paratha कृती: आवरणासाठी: गव्हाचे पीठ, गरम तूप, मीठ व पाणी मिक्स करून पीठ माळून घेवून अर्धा तास बाजूला ठेऊन त्याचे आठ एकसारखे गोळे बनवा. चणाडाळ धुऊन १० मिनिट भिजत ठेवा मग प्रेशर कुकरमध्ये डाळ व अडीच कप पाणी घालून कुकरला तीन शिट्या काढा. कुकर थंड झाल्यावर कुकरचे झाकण काढून डाळ थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका कढईमधे दोन टे स्पून गरम करून त्यामध्ये हिंग, धनेपूड, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून वाटलेली चणाडाळ व चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करून मंद विस्तवावर [...]
↧