कापूर किंवा कपुर हा आपल्या परिचयाचा आहे. कापूर आपण नेहमी पूजे साठी वापरतो. पण पूजेच्या व्यतिरिक्त कापुरचे अनेक उपयोग आहे. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी सुद्धा आहे. आपल्या शास्त्रा च्या मते आपण पूजेच्या वेळी कापूर लावलातर आपल्याला पुण्य लाभते असे म्हणतात. म्हणून रोज सकाळी व संद्याकाळी कापूर लावतात. रोज कापुर लावल्यामुळे पितृदोष किंवा कालसर्प दोष चा प्रभाव कमी होतो. बरेच जण म्हणतात आम्हाला पितृदोष अथवा कालसर्पयोग आहे त्यामुळे आम्हला त्रास होतो पण तसे नसून राहू अथवा केतू च्या प्रभावा मुळे आपल्याला त्रास होत असतो. ह्याचा प्रभाव ठीक करायचा असेल तर आपली राहती वस्तू नीट करायला पाहिजे. समजा आपली वास्तू आपण ठीक करू शकत नसाल तर एक सोपा साधा उयाय आहे तो म्हणजे रोज सकाळी, संध्याकाळी व रात्री तुपामध्ये भिजवलेला कापूर लावावा. तसेच घरातील स्नानगृहामध्ये २-२ कपूरच्या वड्या फक्त ठेवाव्यात. कपूरचा अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे रात्री झोपताना हनुमान चालीसा वाचून झाल्यावर घरात कापूर लावावा म्हणजे आकस्मित घटना किंवा दुर्घटना ज्या राहू, केतू व शनीच्या पप्रभावाने होतात त्या होण्याच्या टळतात. खर म्हणजे ज्या घरात रोज सकाळ-संध्याकाळी कापूर लावतात त्या घरात अश्या आकस्मित घटना अथवा दुर्घटना होत नाहीत. रात्री झोपण्याच्या आगोदर कापूर लाऊन मग झोपणे हे तर खूप लाभदायक आहे. घरामधील नकारात्मक उर्जा नष्ट करायची असेल व शांती निर्माण करायची असेलतर [...]
↧