खजूर : खजूर हा चवीला गोड व पौस्टिक आहे. खजूर वाळवून त्याची खारीक बनवतात हे आपल्याला माहीत आहेच. खजुरा मध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” पुष्कळ प्रमाणात असते. खाजुरात लोह, क्यालशीयम, तांबे, आहे. “ए” जीवनसत्वमुळे शरीरातील अवयवांचा चांगला विकास होतो. “बी” जीवनसत्व ह्रुदयास हितावह आहे भूक चांगली लागते. “सी” जीवनसत्व मुळे प्रतिकारशक्ती वाढते व बाहेरील विषारी जंतूचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही तसेच ते जंतू शरीरात प्रवेश सुद्धा करू शकत नाही. खाजुरामध्ये ८५% साखरेचे प्रमाण आहे. गोड, थंड, गुरु गुणाचा खजूर वात-पित्तशामक आहे. चक्कर येणे, पाठ दुखी,, कंबरदुखी यावर खूप उपयोगी आहे. खजूर पचण्यास जड व शीतल असा आहे. आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात उकळून घ्यावा. खजूर गरम नसून थंड आहे. खजूर हा धातू वर्धक आहे तसेच कृमी नस्ट करतो. शरीराचा दाह होत असेल तर त्यावर खजूर खूप उपयोगी आहे. खजूर हा कफावर गुणकारी आहे, क्षय रोगात खूप उपयोगी आहे. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाले असता थकवा येणे, धाप लागणे, छातीत धडधडणे, अश्या वेळी खजूर खावा. खाजुरात खोकला व कफनाशक गुणधर्म आहेत. खूप काम केल्यावर थकवा आला असेलतर खजूर खावा. स्त्रियांमध्ये पाय दुखणे, सांधे दुखणे बऱ्याच प्रमाणात आढळते. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. एक कप दुध चांगले गरम करून घ्या त्यामध्ये एक टी स्पून गाईचे [...]
↧