नाचणीची शेव: नाचणीची शेव ही पौस्टिक आहे. साधारणपणे राजस्थान, ओडीसा ह्या भागात बनवली जाते. ही शेव बनवतांना नाचणी, बेसन व तांदळाचे पीठ वापरले आहे. हे शेव उपमा बरोबर किंवा चहा बरोबर खायला खूप छान आहे. साहित्य: २ कप नाचणी २ कप बेसन १/२ कप तांदळाचे पीठ २ टी स्पून ओवा १/२ टी स्पून हिंग १/२ कप तेल मीठ चवीने तेल शेव तळण्यासाठी Nachni Sev कृती: प्रथम ओवा गरम पाण्यात एक तास भिजत घालून मग चांगला बारीक वाटुन घ्या. नाचणीचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ व हिंग चाळणीने दोन वेळा चाळून घ्या. मग त्यामध्ये तेल घालून मिक्स करून घेऊन ओवाचे मिश्रण घालून व पाणी वापरून पीठ चांगले मळून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. शेव बनवण्यासाठी साचा घेऊन त्यामध्ये शेवेचे पीठ भरून गरम तेलात गोल आकाराची शेव घाला. शेव घालतांना विस्तव मोठा ठेवा व शेव घातलीकी लगेच उलट करून विस्तव कमी करा. शेव दोनीही घाजुनी छान कुकुरीत होई परंत तळून घ्या. शेव तळून झालीकी पेपरवर ठेवा. अश्या प्रकारे सर्व शेव बनवून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.
↧