आजकाल काही महिन्या पासून डेंगू व चिकुनगुन्या ह्या व्हायरलने खूप थैमान मांडले आहे. चिकुन गुण्या व डेंगी हा रोग Aedes Aegyptih ह्या मछरांच्या चावण्यामुळे होतो. पावसाचे पाणी साठून त्या पाण्यात किंवा साठवलेल्या पाण्यात हे मछर तयार होतात. आपली रक्त तपासणी करून ह्या रोगाचे निदान केले जाते. चिकुन गुण्या हा व्हायरल रोग झाल्यावर त्यावर औषध उपचार झाल्यावर सुद्धा व चिकुनगुन्या बरा झाल्यावर सुद्धा सांधेदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात होतो. सांधे दुखीवर फक्त पेन किलर घ्यावे लागते पण पेन कीलरचे बरेच दुष्परिणाम होतात. पेन किलर न घेता एक तेल घरीच बनवा व रोज २-३ वेळा सांधे दुखतात तेथे लावा त्यामुळे बराच आराम वाटतो. चिकुनगुन्या हा रोग झाला हे कसे ओळखावे. १०२ परंत ताप येणे व ताप येण्यामध्ये चढ उतार होणे. तापामध्ये थंडी वाजून येणे. अंगावर लाल चट्टे येणे व अंग दुखणे. सांधेदुखी चालू होणे, पोट दुखी व उलटी होणे. शरीरात अशक्तपणा येणे, भूक न लागणे. डोळे दुखणे ही लक्षणे चालू झालीकी लगेच तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन औषध उपचार चालू करावा. चिकुनगुन्या बरा झाल्यानंतर सुद्धा सांधे खूप दुखतात तेव्हा सोपा उपाय म्हणजे पेशंट पेन किलर घेतात व ते पेन किलर तात्पुरता उपयोगी पडतात. पेन किलर घेण्याच्या आयवजी खाली दिलेले तेल घरी बनवून त्याने मसाज करावा त्याने आराम मिळेल. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट प्रमाण: १०० [...]
↧