उपवासाचे कबाब: उपवासाचे कबाब ही एक छान टेस्टी डीश आहे. नेहमीच साबुदाणा खिचडी वगेरे बनवतो. उपवासाचे पनीर बनवून बघा. कबाब बनवतांना पनीर, खवा, उकडलेला बटाटा वापरला आहे. तसेच सारणासाठी ड्रायफ्रुट घातले आहेत. बनवण्या साठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १०-१२ कबाब बनवतात साहित्य: १ कप पनीर २ मध्यम आकाराचे बटाटे ३ टे स्पून बदाम पावडर १ टे स्पून मिल्क पावडर किंवा १ १/२ टेस्पून खवा १/२ टी स्पून मिरे पावडर २-३ हिरव्या मिरच्या २ टे स्पून कोथंबीर १/४ कप ड्रायफ्रुट (काजू,बदाम,पिस्ते) मीठ चवीने तेल तळण्यासाठी Upvasache Paneer Batata Kabab कृती: पनीर किसून घ्या. बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. बदामाची पावडर करून घ्या. खवा किसून घ्या. हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्या. कोथंबीर धऊन चिरून घ्या. काजू, बदाम, पिस्ता तुकडे करून घ्या. पनीर, किसलेले बटाटे, खवा, मिरे पावडर, हिरवी मिरची, कोथंबीर, मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मग त्याचे एकसारखे १०-१२ गोळे बनवून घ्या. प्रत्येक गोळ्या मध्ये ड्रायफ्रुट ठेवून गोळा बंद करा, असे सर्व गोळे बनवून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर कबाब छान कुरकुरीत तळून घ्या. गरम गरम कबाब नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
↧