वजन कमी करायचे का? मग काय करायला हवे त्याचे काही स्मार्ट सोप्या टिप्स. सकाळी नाश्याला किंवा न्याहरीला ज्वारी, मका अथवा राजगीरा लाह्या गाईच्या दुधामध्ये घालून घ्याव्यात. त्यामुळे पोट सुद्धा भरते व नाश्ता सुद्धा होतो. मधून मधून रव्याचा उपमा सुद्धा करता येतो किंवा राजगीराच्या लाह्यांचा सुद्धा उपमा करता येते हा उपमा चवीस्ट लागतो. हा उपमा बनवायला सोपा, पचण्यास हलका व हेल्दी सुद्धा आहे. बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी: १ जणासाठी साहित्य: १ कप राजगीऱ्याच्या लाह्या १/४ कप पाणी (किंवा अजून लागलेतर घ्यावे) १/४ टी स्पून लिंबूरस मीठ व साखर चवीने २ टे स्पून कोथंबीर (चिरून) फोडणी करीता: १ टी स्पून तेल १/२ टी स्पून मोहरी १/२ टी स्पून जिरे १/४ टी स्पून हिंग ५ कडीपत्ता पाने १/४ टी स्पून हळद साहित्य: एका कढईमधे तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, हळद घालून मग राजगीऱ्याच्या लाह्या घालून दोन मिनिट परतून घेऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून मिक्स करून मीठ, लिंबूरस, साखर, कोथंबीर घालून मिक्स करून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. गरम गरम उपमा सर्व्ह करावा. खालील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर नक्की फायदा होयील नाश्ता झाल्यावर दुपारच्या जेवणात चपाती आयवजी ज्वारीची, बाजरीची, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी बनवावी. ह्या भाक्रीमुळे पोट सुद्धा भरते. वजन वाढत नाही. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी जेवणात भाकरी आवश्क [...]
↧