Quantcast
Channel: royalchef.info
Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi

$
0
0
चकली (कणकेची उकडीची): चकली म्हंटल की आपल्याला भाजणीची चकली आठवते. गव्हाच्या पीठाची किंवा कणकेची उकड काढलेली चकली ही झटपट होणारी आहे व तसेच ती खमंग पण लागते. कणकेची उकड काढलेली चकली ही टेस्टी लागते. बनवायला सोपी व खमंग पण लागते. ह्यामध्ये फक्त कणकेला वाफ द्यायची आहे. कणकेमध्ये तेलाचे मोहन घालू नये त्याने चकल्या खूप तेलकट होतात किंवा तेला मध्ये विरघळतात. चकल्या तळताना जरा काळजी घ्या चकली तळताना फार काळपट तळू नका नाहीतर त्या करपट लागतात. थोड्या पिवळसर रंगामध्ये तळून घ्या. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: २०-२५ चकल्या साहित्य: ३ कप कणिक (गव्हाचे पीठ) ३ टी स्पून लाल मिरची पावडर १/४ टी स्पून हळद ३ टी स्पून तीळ १/४ टी स्पून ओवा मीठ चवीने तेल चकली तळण्यासाठी Zatpat Kankechi Chakli कृती: एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये कणिक, लाल मिरची पावडर हळद, ओवा, तीळ, मीठ घालून मिक्स करून घेऊन एका मलमलच्या कापडात सैलसर बांधून घ्या. मग कुकरमध्ये 30 मिनिट वाफवून घ्या. मग कुकरमध्ये वाफवलेली कणिक पाण्याच्या हाताने चांगली मळून घ्या. त्याचे एक सारखे गोळे बनवून घ्या. चकली यंत्रामध्ये (सोरया) एक गोळा ठेऊन पेपरवर त्याच्या चकल्या पाडून घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चकल्या तळून घ्या.

Viewing all articles
Browse latest Browse all 1150

Latest Images

Trending Articles