फ्रुट चॉकलेट पँन केक: फ्रुट चॉकलेट पँन केक ही एक नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. आपण नेहमी पँन केक बनवत असतो जर ह्या पँन केक मध्ये जरा वेगळेपण केले तर व त्याला चॉकलेट फेव्हर दिला तर त्याची एक वेगळीच मज्जा येईल. परत वरतून त्याला सजावटी साठी फळे चिरून घातली तर खूप छान चव येईल. The English language version of the same Pancake recipe and preparation method can be seen here – Fruit-Chocolate Pancake बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ७-८ पँन केक बनतात साहित्य: १ कप गव्हाचे पीठ १/२ कप मैदा १ कप दुध २ टे स्पून साखर १ टे स्पून कोको पावडर १ टी स्पून बेकिंग पावडर १ अंडे (फेटून) फळे (चिरून आपल्याला आवडतील ती) डार्क चॉकलेट (किसून) तूप पँनकेक फ्राय करण्यासाठी Fruit Chocolate Pancake कृती: गव्हाचे पीठ, मैदा, साखर, बेकिंग पावडर, दुध कोको पावडर, मीठ मिक्स करून लागेल तसे पाणी वापरून भज्याच्या पीठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. एका बाऊलमध्ये अंडे फोडून फेटून घ्या. मग फेटलेले अंडे भिजवलेल्या मिश्रणामध्ये घालून चांगले मिक्स करा. नॉनस्टिक पँन गरम करून त्यावर एक टी स्पून तूप लाऊन १/२ कप मिश्रण घालून थोडेसे जाडसर पसरवून घ्या व कडेनी थोडेसे तूप सोडा. पँनकेक दोनीही बाजूनी छान खमंग परतून घ्या. चॉकलेट पँनकेक सर्व्ह करतांना वरतून चिरलेली फळे घालून [...]
↧