सीताफळ – आंबा रबडी: सीताफळ आंबा रबडी ही एक छान स्वीट डीश अथवा डेझर्ट म्हणून बनवायला चांगली आहे. ही रबडी बनवताना सीताफळाच्या बिया काढून घेतल्या आहेत. मग दुध थोडे आटवून त्यामध्ये शेवया शिजवून साखर घालून थोडे गरम करून मग थंड केले आहे व थंड झाल्यावर सीताफळ व अंबा घालून थंड करून घेतले आहे. The English language version of this Rabdi recipe and the preparation method can be seen here – Sitaphal Mango Rabri बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: १ लिटर दुध १ कप साखर १ कप शेवया १ टी स्पून वेलचीपूड २ कप सीताफळ पल्प २ कप आंब्याचा पल्प Sitaphal-Amba Rabdi कृती: सीताफळाच्या बिया काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. आंब्याचा पल्प पण ब्लेंड करून घ्या. दुध थोडे आटवून घ्या मग त्यामध्ये शेवया घालून पाच मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. शेवया शिजल्यावर त्यामध्ये साखर घालून दोन मिनिट उकळवून घेऊन थंड करायला ठेवा. पूर्ण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड, सीताफळ पल्प, आंब्याचा पल्प घालून मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. सर्व्ह करतांना वरतून आंब्याच्या बारीक फोडी घालून सजवा.
↧