फ्रोझन योगर्ट: आता एप्रिल. मे मध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे सर्वाना थंडगार काहीना काही खावेसे वाटते. आपण नेहमी थंड दही जेवणात सर्व्ह करतो. फ्रोजन केलेले दही करून पहा सर्वाना आवडेल. हे बनवायला अगदी सोपे आहे व तसेच चवीस्ट पण लागते. ह्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. मी हे बनवताना लिंबूरस वापरला व लिंबू किसून त्याची साले घातली आहेत त्यामुळे ह्याची चव अप्रतीम लागते. जेली घातल्यामुळे त्याचा रंगपण छान आला आहे. The English language version of the same recipe can be seen here – Delicious Frozen Yogurt बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: ३ कप दही १/२ कप कनडेन्स मिल्क २ टे स्पून लिंबूरस १ टी स्पून लिंबाची साले १ कप फ्रेश क्रीम १/२ कप जेलेची तुकडे कृती: दही एका मलमलच्या कापडात ठेवून घट्ट बांधून २ तास टांगून ठेवा. लिंबू किसून त्याची पिवळी साले बाजूला कडून ठेवा. क्रीम चांगले फेटून घ्या. जेलीचे बारीक तुकडे करून घ्या. दोन तासा नंतर एका काचेच्या भांड्यात दही काढून घ्या. त्यामध्ये लिंबूरस, लिंबाची साले, क्रीम, कंडेन्स मिक्ल व जेलीचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या. योगर्ट तयार झाले आता ते फ्रीजमध्ये ७-८ तास थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.
The post Frozen Yogurt Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.