थंडगार काकडीचे सूप: काकडी ही एक फळ भाजी आहे. काकडी ही प्रकृतीसाठी थंड आहे. आपल्या शरीरातील उष्णता काकडीच्या सेवनाने कमी होते. उन्हाळ्यात काकडीचे सूप थंड करून खूप छान लागते. तसेच त्यामध्ये दही व दुध मिक्स करून पुदिन्याची पाने घालून त्याची टेस्ट अप्रतीम लागते. The English language version of this Soup recipe can be seen here – Appetizing Kakdi-Pudina Soup बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट थंड करायचा वेळ: २ तास वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २-३ मोठ्या ताज्या काकड्या २ कप दही १/२ कप दुध ३ टे स्पून साखर मिरी पावडर चवीने मीठ चवीने १०-१५ पुदिना पाने Chilled Cucumber Soup कृती: प्रथम काकडी धुऊन, सोलून किसून घ्या. पुदिना पाने धुऊन चिरून घ्या. एका बाउलमध्ये दही, दुध, साखर, मीठ मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये किसलेली काकडी, मिरे पावडर घालून मिक्स करून फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवा. काकडीचे सूप थंड सर्व्ह करा. सर्व्ह करताना चिरलेली पुदिना पाने घालून मिरी पावडर भुरभुरून मग सर्व्ह करा.
The post Chilled Cucumber Soup Recipe in Marathi appeared first on Royal Chef Sujata.